व्हॅलेंटाईन विकचा तिसरा दिवस नात्यात गोडवा आणण्यासाठी चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. चॉकलेट डे दरवर्षी ९ फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या प्रिय व्यक्ती, मित्र किंवा क्रश यांना चॉकलेट देऊन त्यांचे प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात. मात्र, हा दिवस केवळ भेटवस्तू देण्यासाठी नसून नात्यात गोडवा आणण्याची आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की लहान गोष्टी देखील एखाद्याला आनंदी करू शकतात. चॉकलेट हे प्रेम आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे व्हॅलेंटाईन वीकमध्ये याला विशेष स्थान देण्यात आले आहे. चॉकलेट डे साजरा केव्हा आणि कसा सुरू झाला, व्हॅलेंटाईन वीकमध्ये चॉकलेट डेचा समावेश करण्याचे कारण आणि महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. चॉकलेट डेचा इतिहास 16 व्या शतकात युरोपमध्ये चॉकलेटची लोकप्रियता वाढली आणि ती प्रेम आणि आनंदाशी जोडली जाऊ लागली. हळुहळू चॉकलेट प्रेम प्रस्ताव आणि विशेष प्रसंगांचा एक भाग बनले. चॉकलेट डे साजरा करण्याचे महत्त्व १) चॉकलेटची गोड चव देखील प्रेम आणि मैत्रीतील गोडपणाचे प्रतीक आहे. हा दिवस लोकांना नातेसंबंध मजबूत करण्याची आणि गैरसमज दूर करण्याची संधी देतो. २) चॉकलेट खाल्ल्याने सेरोटोनिन आणि डोपामाइन नावाचे आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात, जे मूड सुधारतात आणि आनंद देतात. ३) तुम्हाला तुमच्या क्रशला तुमच्या भावना व्यक्त करायच्या असल्यास त्याला चॉकलेट डेला चॉकलेट देऊन मैत्री आणि प्रेमाची सुरूवात करू शकता. ४) चॉकलेट तणाव कमी करण्यास मदत करते. त्यामुळे चॉकलेट गिफ्ट करून तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा मित्रांना आनंद देऊ शकता.