Share Market | ऑगस्टचा पहिलाच दिवस ठरला दमदार; निफ्टी पहिल्यांदाच 25 हजारांवर

Share Market | आज 1 ऑगस्ट रोजी देशांतर्गत शेअर बाजारात चांगली कामगिरी पाहायला मिळत आहे. गुरुवारी शेअर बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. व्यवहाराच्या काही मिनिटांतच सेन्सेक्सनेही 82 हजारांचा टप्पा पार केला आहे. सुरुवातीला सेन्सेक्स सुमारे 350 अंकांच्या मोठ्या वाढीसह 82,100 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. तर निफ्टी 115 अंकांच्या वाढीसह 25,065 अंकांच्या जवळ होता. निफ्टीने इतिहासात पहिल्यांदाच 25 हजार अंकांची पातळी गाठली आहे.
आयटी वगळता निफ्टी क्षेत्रातील सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल दिसून येत आहे. आज बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1.64 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बीएसई सेन्सेक्स कामकाजादरम्यान 190.30 अंकांनी वधारून 81, 931.64 वर आणि निफ्टी 50,74.85 अंकांनी वधारून 25,026.00 वर होता.
बीएसई सेन्सेक्स प्री-ओपन सत्रात 200 हून अधिक अंकांनी वर होता आणि 81,950 अंकांच्या जवळ पोहोचला होता. त्याच वेळी, NSE चा निफ्टी 50 प्री-ओपन सत्रात सुमारे 80 अंकांच्या वाढीसह 25 हजार अंकांच्या पुढे गेला आणि 25,030 अंकांवर पोहोचला.
कोणत्या शेअर्समध्ये वाढ ?
सकाळच्या सत्रात सेन्सेक्सवरील 23 हून अधिक शेअर्स नफ्यात होते. मारुती सुझुकीमध्ये सर्वाधिक 2.50 टक्के वाढ दिसून आली. जेएसडब्ल्यू स्टीलही 2 टक्क्यांहून अधिक मजबूत होता. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स सारख्या शेअर्समध्ये 1 ते 2 टक्क्यांनी वाढ झाली. दुसरीकडे, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक आणि इन्फोसिसचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहे. इन्फोसिसचे शेअर्स 0.50 टक्क्यांहून अधिक घसरले.
बुधवारी BSE सेन्सेक्स 285.94 अंकांच्या (0.35 टक्के) वाढीसह 81,741.34 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 93.85 अंकांच्या (0.38 टक्के) वाढीसह 24,951.15 अंकांवर बंद झाला. त्यापूर्वी मंगळवारी सेन्सेक्स केवळ 99.56 अंकांनी (0.12 टक्के) वाढला होता आणि निफ्टी 50 निर्देशांक केवळ 21.20 अंकांनी वाढला होता.
हेही वाचा:
हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार…! अवघ्या 7 सेकंदात चार मजली इमारत पाण्यात बुडाली; व्हिडिओ व्हायरल





