ररंगीबेरंगी कपडे किंवा विनोदी हावभाव अशा वेगवेगळ्या कारणांसाठी णवीर सिंह नेहमीच चर्चेत असतो. असाच एकदम अफलातून प्रकार रणवीरने केला आहे आणि त्याचा फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे रणवीरबाबतची चर्चा पुन्हा रंगायला लागली आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावरचे पाय रणवीरने घट्ट पकडले आहेत, असा हा फोटो आहे.
यावेळी शामक दावरला अक्षरशः आपला चेहरा झाकून घ्यावा लागला आहे. रणवीरने नेहमीप्रमाणे अतिशय भडक भगवा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट असे रंगीबेरंगी कपडे घातले आहेत. यावेळी शामक दावरबरोबर केवळ मौज मस्ती आणि धिंगाणा चालला होता, असे समजते आहे. इन्स्टाग्रामवर रणवीरने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. “83′ या सिनेमाचे शुटिंग नुकतेच संपले असल्याचे रणवीरने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. भारताने क्रिकेटचा विश्वचषक 1983 साली पहिल्यांदा जिंकला होता. त्या विजयावर आधारलेल्या सिनेमात रणवीर महान क्रिकेटपटू कपिल देव यांचा रोल करतो आहे. गंमत अशी की रणबीरची “ऑफ स्क्रीन’ पत्नी दीपिका ही याच सिनेमात रणवीरची म्हणजेच कपिल देव यांच्या पत्नीच्या रोलमध्ये दिसणार आहे.