रणबीर कपूरची ‘धूम 4’मध्ये होणार एन्ट्री ?

Ranbir Kapoor | बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता रणबीर कपूरने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. ‘धूम 4’ चित्रपटात रणबीर मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात रणबीर खलनायकच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
तर अभिषेक बच्चनला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. धूममध्ये रणबीर कपूरच्या एन्ट्रीने काही नेटिझन्स खूश आहेत, तर अनेक नेटिझन्सनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांकडूनरणबीर कपूर धूम 4 मध्ये प्रवेश करणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचे समीक्षक सुमित कडेल यांनी सोशल मीडियाद्वारे ‘धूम-४’ मध्ये रणबीर कपूरला कास्ट करण्यात आल्याचं सांगितल आहे. 2004 साली प्रदर्शित झालेल्या धूम चित्रपटाच्या यशानंतर याचा दुसरा आणि तिसरा भागही रिलीज झाला. आता या चित्रपटच्या चौथ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
रणबीर कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ‘सावरिया’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. रणबीरने आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले. त्याचा शेवटचा ‘ॲनिमल’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
आता रणबीर ‘रामायण’ चित्रपटात भगवान श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री साई पल्लवी आई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच ‘लव अॅंड वॉर’ चित्रपटाचे देखील तो शूटिंग करत आहे.





