स्टायलिश हुडीमध्ये चेहरा लपवताना दिसला बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता; पाहताच क्षणी चाहत्यांनी केली गर्दी

Shahrukh Khan: बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण, जवान आणि डंकी हे सलग तिन्ही चित्रपट सुपरहिट झाले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. या चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहरुख खान हुडी घातलेल्या स्टायलिश लूकमध्ये दिसला. त्याचा हा लुक सध्या चाहत्यांच्याही प्रचंड पसंतीस पडत असल्याचे दिसत आहे.
शाहरुख अनेकदा सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र तरीही चाहते त्याला ओळखतात. नुकतेच स्टायलिश हुडीच्या कॅपने शाहरुख खानने त्याचा चेहरा लपवला होता. पण तरीही त्याला पापाराझींनी आणि काही चाहत्यांनी ओळखले. त्यानंतर शाहरुख खानचा हा लुक काही जणांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
View this post on Instagram
त्याचे झाले असे की, शाहरुख खान मुंबईतील एका क्लिनिकमधून बाहेर पडताना दिसला. यावेळी त्यानेचेहरा लपवला पण त्याची ओळख पटली आणि चाहते त्याचे फोटो क्लिक करू लागले. गर्दी आणि कॅमेरे टाळत शाहरुख आपल्या कारमध्ये जाऊन बसला. शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये शाहरुखने ग्रे कलरची लाँग हुडी घातली आहे. हुडीच्या कॅपने त्याने आपला चेहरा पूर्णपणे लपविला आहे. मात्र चाहत्यांनी त्याला ओळखताच मोठी गर्दी केली. शाहरुख खानचे फोटो कोणी काढू नये यासाठी त्याच्या सुरक्षारक्षकाने अनेक प्रयत्न केले.पण शाहरुखचा फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या कारच्या अवतीभोवती घेराव घातला होता. शाहरुख खानच्या या व्हिडिओवर चाहतेही विविध कमेंट करत त्याच्या या लूकचे कौतुक करत आहेत.





