अन् लग्न मंडपातील पाहुणेचं पैसे गोळा करू लागले… नवरदेवावर लाखो रुपये उडवणे कुटुंबियांना पडलं महागात पहा Video

नवी दिल्ली – लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यतील महत्वाची वेळ. म्हणूनच अनेकजण याची आठवण लक्षात राहावी यासाठी मोठा खर्च करताना दिसतात. डेकोरेशनपासून ते पाहुण्यांच्या जेवणापर्यंतच्या सर्व गोष्टी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने करण्याचा दोन्हही कुटुंबीयांचा प्रयत्न राहतो. अशाच एका लग्नाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. या लग्नात कुटुंबीयांनी नवरदेवावर लाखो रुपये उडवल्याचे देखील बोलले जात आहे. तसा या लग्नातील एक व्हिडीओ देखील खूप व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला प्रश्न पडेल की याठिकाणी नेमकं काय घडलं असावं.
लग्नासाठी प्री वेडिंग आणि पोस्ट वेडींगसाठी नवरा नवरी भरमसाठ खर्च करतात ते तुम्ही अनेकदा ऐकलं आणि पाहिलंय असेल. परंतु याच नवरा नवरीवर कुटुंबीय लाखो रुपये उडवू शकतात हे या व्हायरल व्हिडीओवरून समजते. व्हायरल व्हिडिओमध्ये जमिनीवर पडलेल्या नोटा अक्षरशः लग्न मंडपातील नातेवाईक गोळा करताना दिसत आहेत. मुलाकडच्यांनी मुलासमोर नाचताना या नोटा त्यावर ओवाळून टाकल्याचं बोललं जात आहे. या नोटांची संख्या इतकी होती की मंडपातील इतर मंडळींनी हे पैसे गोळा करायला सुरुवात केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.
अमृतसर में एक #शादी का वीडियो है, जहां एक ओर लोग #नोटों की #बारिश कर रहे हैं और वहीं दूसरी ओर कुछ लोग पैसे #बटोरने में लगे हैं।
ये वीडियो #वायरल है। pic.twitter.com/XjmTz3caZ2— Kumar Amit Kumar (@Amitkum3399) January 6, 2023
हा व्हिडीओ पंजाबमधील अमृतसर येथील आहे. व्हिडिओमध्ये मंडपात पैसे गोळा करणारे लोक दिसत आहेत. लग्न मंडपातील अशी दृश्य तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल त्यामुळे यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण असले तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरी यावर कमेंट करून या लग्नाबाबतची अधिक माहिती विचहरात आहेत.





