चाहत्यांच्या अपेक्षांचे माझ्यावरही दडपण – उपकर्णधार पंड्या
Updated On:

कोलंबो :- संघाच्या विजयात माझा वाटा असावा असे मला प्रत्येक सामन्यात वाटते. मात्र, चाहत्यांच्या अपेक्षांचे दडपण माझ्यावरही असते, असे भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याने सांगितले आहे.
सामना जर पाकिस्तानविरुद्ध असेल तर हे दडपण कीत्येक पटींनी जास्त असते. अन्य कोणत्याही सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला तर त्याचे जीतके वाइट वाटत नाही तेवढे पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर चाहत्यांनाच नव्हे तर आम्हा खेळाडूंनाही वाटते. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत जीव ओतून खेळण्याचाच माझा प्रयत्न असतो.
काहीवेळा यश मिळत नाही; परंतु त्यामुळे मी मानसिकरीत्या खालावत नाही तर नंतरच्या सामन्यांसाठी क्षमतेपेक्षाही जास्त सरस कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो, असेही देखील पंड्या म्हणाला.





