#CWC23 INDvPAK : भारताला मिळाले दुसरे यश, इमाम उल हकला हार्दिक पांड्याने केले बाद

World Cup 2023 #INDvPAK Match Update : एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकाच्या इतिहासातील उभय संघांमधील हा आठवा सामना आहे. टीम इंडियाचा रेकॉर्ड 7-0 असा आहे.
सामन्यात हार्दिक पांड्याने भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने 13व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानी सलामीवीर इमाम हकला बाद केले. इमाम 38 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. हार्दिकच्या आउटगोइंग चेंडूवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. विकेटकीपर केएल राहुलने त्याचा झेल घेतला. पाकिस्तानची धावसंख्या 13 षटकात 2 बाद 74 धावा आहे. बाबर आझम 16 धावांवर तर मोहम्मद रिझवान एका धावेवर नाबाद आहे.
CWC2023. WICKET! 12.3: Imam ul Haq 36(38) ct K L Rahul b Hardik Pandya, Pakistan 73/2 https://t.co/RBULW3l3hQ #INDvPAK #CWC23
— BCCI (@BCCI) October 14, 2023
त्याआधी, मोहम्मद सिराजने भारताला पहिले यश मिळवून दिले. डावाच्या आठव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने अब्दुल्ला शफिकला बाद केले. शफिकला त्याचा चेंडू लेग साइडला खेळायचा होता, पण तो चुकला. चेंडू थेट त्याच्या पॅडवर गेला. शफिकचा पाय यष्टीच्या समोर होता. सिराजच्या अपिलवर पंचांनी शफीकला बाद घोषित केले. शफीक 24 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. शफीकने इमाम उल हकसह पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली.
दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे :-
भारत : शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफरीदी, हारिस रऊफ
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 मध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारतीय संघाला ही विजयी मालिका सुरू ठेवायची आहे. टीम इंडिया तिसर्यांदा विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. भारताने 1996 (बंगलोर) आणि 2011 (मोहाली) मध्ये विजय मिळवला होता.





