चालक अचानक पडला आजारी अन् संकर्षणने हाती घेतलं बसचं स्टेअरिंग; प्रशांत दामलेंनी शेअर केला व्हिडिओ

Updated On:

मुंबई – अभिनेता आणि लेखक संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. अनेक नाटक मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र सध्या संकर्षण एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर संकर्षणाचा बस चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

त्याचे झाले असे की, नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेल्या बसच्या चालकाची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे थेट संकर्षणने बस लोणावळ्यापर्यंत चालवली. हा व्हिडिओ अभिनेते प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर शेअर करत संकर्षणचे कौतुक केले आहे. ‘नियम व अटी लागू’ नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा हा व्हिडिओ आहे.

प्रशांत दामले यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बर वाटेनास झाल. साधारणपणे प्रयोग 12.30 ला संपल्यावर आम्ही सेट भरून जेवून पहाटे 2 च्या सुमारास मुंबईकडे निघतो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळच थांबल. पण थांबेल तो संक्या कसला.’

‘त्याने चालकाला मागे झोपवल आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला.इसको बोलता हैं जिगर नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालु आहेत.’ सध्या संकर्षणच्या या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेक जण त्याच्या कामगिरीचे कौतुक करत आहे.

आणखी संबंधित बातम्या

K. T. Rama Rao : ‘स्टारलिंक’ रोखणाऱ्यांची नावे जाहीर करा; मस्क यांच्या आरोपांनंतर के. टी. रामाराव यांची मागणी

2026-10-08 16:18:58

K. T. Rama Rao : ‘स्टारलिंक’ रोखणाऱ्यांची नावे जाहीर करा; मस्क यांच्या आरोपांनंतर के. टी. रामाराव यांची मागणी

Kiara and Sidharth Malhotra : कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा; फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज'

2026-10-07 12:00:00

Kiara and Sidharth Malhotra : कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा; फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज'

Jaya Bachchan : जया बच्चन यांनी आंदोलनादरम्यान थेट पत्रकाराचा माइकचं ढकलला; कंगणा यांनी साधला निशाणा

2026-10-07 09:35:12

Jaya Bachchan : जया बच्चन यांनी आंदोलनादरम्यान थेट पत्रकाराचा माइकचं ढकलला; कंगणा यांनी  साधला निशाणा

Girija Oak Photo: लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खुलले गिरीजा ओकचे सौंदर्य; बोल्ड लुकवर चाहते फिदा

2026-10-05 14:56:28

Girija Oak Photo: लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खुलले गिरीजा ओकचे सौंदर्य; बोल्ड लुकवर चाहते फिदा

Allu Shirish: हनुमान मंदिरातील डीजेच्या आवाजाचा त्रास; अभिनेत्याची थेट पोलिसांत तक्रार; ट्रोल करणाऱ्यांना दिलं प्रत्युत्तर

2026-09-29 11:04:27

Allu Shirish: हनुमान मंदिरातील डीजेच्या आवाजाचा त्रास; अभिनेत्याची थेट पोलिसांत तक्रार; ट्रोल करणाऱ्यांना दिलं प्रत्युत्तर