पिंपरी | नालेसफाई केली परंतु नालेतील सांड पाणी, कचरा येतोय रस्त्यावरच

पिंपरी, (प्रतिनिधी) – पावसाळ्याच्या आधी महापालिकेच्या वतीने शहरात जेसीबी, पोकलेन व स्पायडर या यंत्रांच्या साहाय्याने शहरात नालेसफाईला वेग आल्याचे दिसून येत आहे. पिंपरी, भाटनगर येथील परिसरात नाल्यांची साफसफाई करण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु नाल्यातील सांड पाणी, कचारा रस्त्यावरच आल्याचे दिसत आहे.
नाल्यातील कचरा एका जागेवर न ठेवता सर्वत्र पसरलेला दिसत आहे. यामुळे त्या पाण्यावर माश्या, अनेक जीव जंतु बसत अहात. यामुळे रोगराई पसरण्यास वेळ लागणार नाही. शहरात आत्तापर्यंत ५० टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. असेच चित्र सर्व ठिकाणी पाहाण्यास मिळत आहे.
जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनच्या साहाय्याने नालेसफाई उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अश्या मोठ मोठया यंत्रांच्या सहाय्याने नालेसफाई केली जात आहे. परंतु ही नालेसफाई कीतपत योग्य आहे. यंत्रांच्या सहाय्याने केलेली सफाई ही नाल्यातील कचरा एका जागेवर ठेवता येत नसून, यामुळे तेथील परिसर अस्वच्छता निर्माण होत आहे. तसेच त्याठिकाणी दुर्गधी ही पसरली आहे.
नाल्यातील कचरा परिसरात पसरल्याने रोगराई वाढू शकते. असे मत नागरिक व्यक्त करित आहेत. पावसाळ्यात नालेसफाईसंदर्भात कामे करण्यास अडथळा निर्माण होतो, त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईचे काम महापालिकेने यंत्रांच्या सहाय्याने नालेसफाई पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच, अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
अनेक नागरिकांचे रोजगार जातील तसेच अश्या समस्या निर्माण होतील. नालेसफाई करताना आवश्यक ठिकाणी जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनने नालेसफाई करण्यात येत. तसेच अरुंद नाल्यांच्या ठिकाणी सुरक्षा साधने वापरूनच नालेसफाई केली जात आहे.
शहरातील विविध भागांत बुजविलेले नाले, नाल्यावर किंवा नाल्यामध्ये केलेले अतिक्रमण, तसेच नाल्याची रुंदी कमी केलेली आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे. असे ही पालिकेच्या आधिका–यांनी सांगितले.
जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनच्या साहाय्याने नालेसफाई करताना अडचणी येत असतील तर, नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहे. तसेच दररोज होणाऱ्या नाले साफसफाईच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. आणि नालेसफाईच्या कामामध्ये दिरंगाई आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. असे पालिकेच्या कर्मचा–यांनडून सांगण्यात आले आहे. परंतु हा कचरा रस्त्यावर न येता एका ठिकाणीच कसा राहिल यावर पालिकेने उपायोजना कराव्यात असे मत नागरिक व्यक्त करित आहेत.





