Satara | जिल्हा परिषद चौकातील ड्रेनेजची जाळी देते अपघातास निमंत्रण

कृष्णानगर, (प्रतिनिधी) – अत्यंत वर्दळीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्हा परिषद चौकातील ड्रेनेजवरील लोखंडी जाळी अत्यंत धोकादायक स्थितीत असून या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही जाळी मुख्य रस्त्यावर असून त्यास आधार देणारी अंतर्गत जाळी तुटल्यामुळे रस्त्यास भेगा गेले आहेत. स्थानिक नागरिकांनी या भोवती दगडे रचून हा धोका निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, ही बाब वाहनचालकाच्या लक्षात न आल्यास अनेक वाहनाचे प्रचंड नुकसान होत आहे.
या भागात अनेक हॉस्पिटल असल्यामुळे रुग्णवाहिका सतत ये जा करत असतात. त्यामुळे वेगात येणाऱ्या .रुग्णवाहिकाच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच या भागात अनेक शैक्षणिक संकुल असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्कूल बसची वाहतूक सुरू असते. सातारा नगरपरिषदेने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे.





