बाजारातील पडझड ही गुंतवणूक वाढविण्याची संधी (भाग-2)

बाजारातील पडझड ही गुंतवणूक वाढविण्याची संधी (भाग-1)

यामुळेच प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या गुंतवणुकीचे नियोजन अतिशय विचारपूर्वक केले पाहिजे. हे करत असताना आपली उद्दीष्टे कोणती आहेत याचा प्राधान्यक्रम निश्चित करावा, उद्दीष्टे पूर्ण करण्याचा कालावधीही ठरवावा, अंदाजे उद्दीष्टांसाठी किती रक्कम लागणार आहे याचीही चाचपण करावी. या संपूर्ण गुंतवणूक प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य गुंतवणूक पर्यायाची निवड.

हे करत असतानाच या गुंतवणूक प्रकारात ठरवलेल्या कालावधीपर्यंत गुंतवणूक सुरुच ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रत्येक गुंतवणुकीचे नियोजन करताना काही आराखडे व अनुभव लक्षात घेतला जातो. परंतु बाजारातील चढउतार पाहता आपण गृहित धरलेले आराखडे अनेकदा चुकू शकतात. यासाठी वेळोवेळी आपल्यानियोजनाचा आढावा घ्यावा.

बाजारातील चढउतार आपल्या गुतंवणुकीस मागे ढकलण्याचे अथवा जोरात पुढे सरकवण्याचे काम करत असते. ज्यावेळी गुंतवणुकीचे मूल्य कमी होते त्यावेळी गुंतवणुकीमध्ये शक्य झाल्यास वृद्धी करत राहावीम्हणजे बाजारात ज्यावेळी मोठी वाढ होते त्यावेळी एकूण गुंतवणुकीत वेगाने उद्दीष्टांच्या रकमेपर्यंत वेळेच्या आधी पोचणे शक्य होते.

आपल्या उद्दीष्टांप्रमाणे योग्य गुंतवणूक करा. शेअर बाजाराच्या चढउताराचा फायदा घ्यायचा असेल तर नियोजन उत्तम हवे. म्युच्युअल फंडांच्या योजना निवडतानाही योग्य खबरदारी घ्या. योजनांच्या पराताव्या काळानुसार बदल होत असतो. कोणताही एक प्रकार दुसऱ्यापेक्षा चांगला आहे असे सिद्ध होत नाही. प्रत्येकाचा परतावा काळानुसार बदलत जातो. म्युच्युअल फंडामध्ये मोठ्या कंपन्यांमध्ये (लार्ज कॅप), मध्यम कंपन्यामध्ये (मिड कॅप) व छोट्या कंपन्यांमध्ये (स्मॉल कॅप) गुंतवणूक केली जाते. पंरतु यातही काळानुसार परतावा बदलत जातो. गेल्या दहा वर्षात गुंतवणुकदारांना मिळालेला परतावा पुढील प्रमाणे  आहे.

(गेल्या दोन वर्षात मोठ्या कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक मध्यम व छोट्या कंपन्यांच्या तुलनेत जास्त परतावा देऊन गेली आहे. परंतु ५  आणि १० वर्षांमध्ये मध्यम व छोट्या कंपन्यांमधील गुंतवणुकीने मोठ्या कंपन्यांमधील गुंतवणुकीच्या तुलनेत जास्त परतावा दिलेला आहे. – स्त्रोत – एम्फी)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)