‘द डर्टी पिक्चर’ अभिनेत्री सिल्क स्मितावर येणार बायोपिक; फर्स्ट लुक समोर

Silk Smitha Biopic | साऊथ सिनेमात बोल्ड भूमिकांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित एका सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. हा तिचा बायोपिक असणार आहे. यापूर्वी ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट सिल्क स्मिताच्या आयुष्यावर होता. ज्यात विद्या बालन मुख्यभूमिकेत होती. तर नसीरुद्दीन शाह, इमरान हाश्मी, तुषार कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 2011 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.
डिसेंबरमध्ये साउथ फिल्म इंडस्ट्रीची क्वीन सिल्क स्मिताच्या जयंतीला अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारीत बायोपिक फिल्मची घोषणा करण्यात आली. अभिनेत्री चंद्रिका रावने या बायोपिकचा टीझर शेअर केला. सुरुवातीला तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींकडे मॅगझीन आणि वृत्तपत्र येतात. त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सिल्क स्मिताच्या बातम्या आलेल्या असतात. इंदिराजी PA ला ही कोण आहे असं विचारतात? तेव्हा PA म्हणतो, “तुम्ही आयर्न लेडी आहात तर ही मॅग्नेटिक लेडी आहे.”
View this post on Instagram
पुढे एका गाडीतून उतरत सिल्क स्मिता प्रवेश करताना दिसते. स्मिताच्या बोल्ड अदा पाहून सर्वच घायाळ होतात. शेवटी स्मितावर झालेले आरोप आणि तिला मिळालेल्या प्रसिद्धीची झलक दिसते. पोस्टरमध्ये अभिनेत्री चंद्रिका रावचा अभिनय आणि लूक हुबेहुब सिल्क स्मितासारखा झालेला दिसतोय. हा सिनेमा लवकरच थिएटरमध्ये रिलीज होईल.
View this post on Instagram
कोण आहे सिल्क स्मिता ?
सिल्क स्मिताचा जन्म एलुरु (आंध्र प्रदेश) येथे झाला. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आपल्या 17 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये पाच भाषांमध्ये 450 चित्रपट केले होते. त्यांचे खरे नाव विजयालक्ष्मी विदलपती होते. त्याच वेळी तिचे स्टेजचे नाव सिल्क स्मिता झाले.





