करोना चाचणी दरातील फरकाची सर्वोच्च न्यायलयाकडून दखल
Updated On:

नवी दिल्ली : करोना चाचणीच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये असणाऱ्या दरांतील फरकाची आज सर्वोच्च न्यायलयाने दखल घेतली. केंद्र सरकारने याबाबत योग्य तोडगा काढण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर राज्यांनी तज्ज्ञांची समीती नेमून रुग्णांची काळजी घेण्याचे आदेश दिले.
न्या. अशोक भूषण, एस. एम. कौल, आणि एम आर शहा यांच्या खंडपीठाने याबाबतचे आदेश दिले. खंडपीठाने देशात करोना चाचणीच्या दरात समानता असण्याची अपेक्षाही व्यक्त केली. मात्र न्यायलय चाचणीचे दर निश्चित करणार नाही तो केंद्राचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. रुग्णांची काळजी घेतली जाते की नाही याची पहाणी करण्यासाठी सीसीटीव्ही बसावण्याची सूचनाही न्यायलयाने केली.





