TTFI vs Manika Batra : न्यायालयाचे टेबल टेनिस संघटनेवर ताशेरे

नवी दिल्ली -भारताची अव्वल महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्रा हीला लक्ष्य केल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने टेबल टेनिस संघटनेवर ताशेरे ओढले आहेत. क्रीडापटूंना लक्ष्य केले जाऊ नये आणि लक्ष्य केले गेले असेल, तर ती गंभीर समस्या आहे, असे ताशेरेही न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी ओढले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवडीसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात अनिवार्य हजेरीच्या नियमाबाबत आव्हान देणारी याचिका मनिकाने उच्च न्यायालयात दाखल केली होती.भारतीय संघटनेप्रमाणेच आता आंतरराष्ट्रीय संघटनेकडूनही एखाद्या आरोपीप्रमाणे वागूणक दिली जात आहे, भारतीय संघटनेने त्यांना माझ्या कृतीबाबत कळवले असावे.
आता मला स्पर्धेच्या सरावाकडे लक्ष केंद्रित करणे कठीण जात आहे,असे मनिकाने म्हटले आहे. मात्र, त्याचवेळी संघटनेनेही खेळाडूंना लक्ष्य करु नये, असेही मनिकाबाबत न्यायालयाने म्हटले आहे.





