“लव्ह गेम्स चित्रपटात बोल्ड सीन्सबाबत घेतलेला निर्णय चुकीचा”; अभिनेत्री पत्रलेखाचा तब्बल १० वर्षानंतर खुलासा

Bollywood actress Patralekha : बॉलीवूड अभिनेत्री पत्रलेखा हिने १० वर्षांपूर्वी एका चित्रपटात केलेल्या बोल्ड सीन्सबाबत मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीवेळी तिच्या ‘लव्ह गेम्स’ या चित्रपटाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तिने उतर घेतलेला निर्णय चुकीचा होता असा म्हणत विचार करायला हवा होता, अशी खंत व्यक्त केली आहे.
अभिनेत्री पत्रलेखा हिने सिटीलाट्स या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात ती अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. यानंतर, २०१६ मध्ये विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘लव्ह गेम्स’ चित्रपटात तिने काम केले. या चित्रपटातील बोल्ड सीन्समुळे ती चर्चेत आली होती. आता इतक्या वर्षांनंतर एका मुलाखतीवेळी चित्रपटाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर तिने खुलासा केला आहे. त्यावेळी वेगळी होती आणि आता मी बदलली आहे, असे ती म्हणाली आहे.
अलिकडेच अभिनेत्री पत्रलेखा हिने बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. यादरम्यान, अभिनेत्रीला विचारण्यात आले की ती पुन्हा ‘लव्ह गेम्स’ चित्रपटासारखी बोल्ड भूमिका साकारणार का? यावर अभिनेत्री स्पष्ट नकार देत म्हणाली, नाही, मी पुन्हा अशी भूमिका साकारणा नाही. १० वर्षांपूर्वीची पत्रलेखा ही खूप वेगळी, खूप लहान मुलगी होती. आता मी पूर्णपणे बदलेली असल्याचे तिने सांगितले.
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आता सध्याची पत्रलेखा हे करू शकत नाही. मी एक गोष्ट स्पष्ट करते, चित्रपटात काहीही चुकीचे नाही. त्यांनी पटकथेत जे लिहिले होते ते बनवले, असल्याचे देखील ती म्हणाली. मी याबद्दल विचार करायला हवा होता आणि भीतीपोटी ते करायला नको होते, कारण सत्य हे आहे की माझ्याकडे काम नव्हतंं, असे स्पष्टीकरण तिने या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेबद्दल दिले आहे.
पण, तरीही मी एकदा विचार करायला हवा होता. असे म्हणत म्हणून मी त्या घेतलेल्या निर्णयासाठी स्वतःला दोषी मानते, असे ती म्हणाले. अभिनेत्री पत्रलेखा यापूर्वी अनुभव सिन्हा यांच्या ‘आयसी ८१४ कंधार हायजॅक’ या वेब सिरीजमध्ये एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसली होती. पत्रलेखाने तिच्या कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत.





