तुकोबांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी
Updated On:

पुणे – वारकऱ्यांमधील उत्साह, हरिनामाचा जयघोष आणि अश्वांबरोबर धावणारे वैष्णवजन अशा आसमंत व्यापणाऱ्या वातावरणात तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा माळीनगर येथे रंगला. लाखो वारकऱ्यांसह परिसरातील ग्रामस्थांनी हा सोहळा डोळ्यांमध्ये टिपला. यानंतर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली.





