करूणा मुंडेंना दरमहा किती पोटगी मिळणार? न्यायालयाच्या निकालानंतर म्हणाल्या, ‘मीच पहिली….’

बीड – मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा शर्मा-मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप मान्य केले आहेत. करुणा शर्मा-मुंडे यांना दरमहा 1,25,000 रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कोर्टाने दिलेल्या निकालानुसार, करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने मान्य केले आहेत. धनंजय मुंडे यांनी करुणा यांना दरमहा 1 लाख 25 हजार तर त्यांची मुलगी शिवानी हिला दरमहा 75 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही पोटगीची रक्कम खटला सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत धनंजय मुंडे यांना द्यावी लागणार आहे.
मी शर्मा नाही तर मुंडे-
मला करुणा शर्मा नाही तर करुणा धनंजय मुंडे म्हणा, अशी प्रतिक्रिया करुणा यांनी वृत्त वाहिनीशी बोलताना दिली. न्यायालयाने मीच धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचे मान्य केले आहे. हे नाव मिळवण्यासाठी मी खूप मोठी किंमत चुकवली असल्याचे देखील करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. ‘न्याय जिंकला’ हीच माझी पहिली प्रतिक्रिया असल्याचे देखील करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.





