Satara | व्याजवाडीतील दाम्पत्याने सजावटीतून दिला सामाजिक संदेश

मांढरदेव, {जीवन मांढरे} – देशभरात काही ठिकाणी महिला व मुलींवर घडलेल्या अत्याचाराबाबत समाजात संतप्त भावना असून याचे पडसाद गणेशोत्सवातील देखाव्यांमधून उमटले आहेत.
वाई तालुक्यातील पिसाळ दाम्पत्याने त्यांच्या घरातील गणपतीसमोर केलेली सजावट परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.
या दाम्पत्याने देखाव्यातून सामाजिक संदेश देताना मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे दिले असून असे प्रकार घडू नयेत हा सामाजिक संदेश दिला आहे.
विविध गणेश मंडळे आप आपल्या पध्दतीने गणपती बाप्पासमोर वेगवेगळे आकर्षक देखावे तयार करतात.त्यामध्ये ते आकर्षक विद्युत रोषणाई, बाप्पाची आकर्षक सजावट, व वेगवेगळे देखावे करतात.
हे सर्व पाहण्यासाठी येणार्या भक्तांच्या मनोरंजनाचे देखील अनेक भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन ते करतात. तसेच घरगुती बाप्पांच्या समोर सुद्धा जे देखावे तयात केले जातात.त्यातून देखील मोठे सामजिक संदेश समाजाला दिले जातात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील सागर पिसाळ व कोमल पिसाळ यांनी त्यांच्या घरातील बाप्पा समोर तयार केलेला वेगळा देखावा.
आत्ता समाजामध्ये जे महिलांवर, मुलींवर काही विक्षिप्त लोकांकडुन वेगवेगळे अन्याय, अत्याचार केले जातात. यावर जनजागृती म्हणून महिलांना समाजामध्ये कशा पद्धतीची शिकवण दिली गेली पाहिजे.
महिलांनी व मुलींनी त्यांचे स्वसंरक्षणा कशा पद्धतीने केले पाहिजे.आपला मुलींना घराबाहेर पडताना त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेण्याची गरज असल्याचे पालकांकडून शिकवले गेले पाहिजे.
तसेच आत्ताच्या संगणकीय व डिजिटलच्या युगात मुलींनी कोण कोणत्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. अशा एक ना अनेक गोष्टींची जागृती या देखाव्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
पिसाळ दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव
हा अनोखा देखाव्याला व्याजवाडीतील तसेच शेजारच्या गावातील ग्रामस्थांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी अशा पद्धतीचा नवीन उपक्रम एक वेगळा देखावा तयार केला.त्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
समाजामध्ये स्त्रियांवर,मुलींवर होणार्या अत्याचारापासून त्यांनी त्यांचे संरक्षण कसे करावेव आपले आयुष्य घडवण्यासाठी आपल्याला पुढे कित्येक मार्ग उपलब्ध आहेत.
याची त्यांना जाणीव व्हावी यासाठी या माध्यमातून छोटासा प्रयत्न केला असल्याचे सागर पिसाळ व त्यांच्या पत्नी सौ. कोमल पिसाळ यांच्याकडून सांगण्यात आले.

