जामखेड : देशातील सर्वात मोठे मानवी रचनेतील “२६ जानेवारी” नाव अहिल्यानगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये प्रजासत्ताक दिनी साकार झाले आहे.
भव्य मानवी रचनेतील “२६ जानेवारी ” नाव कलाशिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी हे सरकारले. या मानवी चित्राची लांबी २२० व रुंदी १९० फूट असून क्षेत्रफळ ४१८०० स्क्वेअर फुट आहे. या मानवी रचनेतील चित्रात भव्य २२५ फूट तिरंगा विद्यार्थ्यांनी हातात धरून फडकवला आहे.
श्री नागेश व कन्या विद्यालय मधील २३०० विद्यार्थी विद्यार्थिनी व १७ महा बटालियन एनसीसीचे नागेश विद्यालयाचे एनसीसी कॅडेट, नागेश व कन्या विद्यालय सर्व शिक्षक सहभागी आहेत.
१७ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे श्री नागेश विद्यालय युनिटने उत्कृष्ट संचलन सादर करून मानवंदना दिली. विविध देशभक्तीचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. हे मानवी रचनेतील नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड साठी पात्र आहे. “२६ जानेवारी”हे देशातील सर्वात मोठे नाव म्हणून नोंद होणार आहे.