देशाचा विकासदर घसरण्याची शक्यता
Updated On:

नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागितक आरोग्य आणीबाणीचा भारताला आर्थिक आघाडीवर मोठा फटका बसण्याचे संकेत आहेत. आशियाई विकास बॅंकेने 2020-2021 या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर चार टक्क्यापर्यंत घसरण्याचे भाकीत वर्तवले आहे.
देशात आधीपासूनच मंदीसदृश्य स्थिती असताना आता करोना व्हायसरच्या संकटामुळे त्यात आणखी भर पडली आहे. आपण आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहोत. करोना व्हायरसमुळे लोकांच आयुष्य विस्कळीत झालं आहे. जगभरातील व्यवसाय, व्यापाराला फटका बसला आहे असे आशियाई विकास बॅंकेचे अध्यक्ष म्हणाले. कोविड-19 भारतात मोठया प्रमाणावर पसरलेला नाही. भारतात कोविड-19 चा फैलाव झालेला नाही असेही ते यावेळी म्हणाले.





