Sanjay Raut | “देशावर संकट अन् पंतप्रधान नट-नट्यांबरोबर व्यस्त”; संजय राऊतांची जहरी टीका

मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याबाबत राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. सरकारने आगामी जगणननेसोबतच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
देशात दहशतवादी हल्ला झाला अन् पंतप्रधान प्रचार अन् अभिनेत्यांसोबत व्यस्त आहेत. सैन्याला तुम्ही बघा काय करायचे ते चांगले झाले तर श्रेय माझे, त्यात चूक झाली तर तुम्ही निर्णय घेतला होता, असं म्हणणाऱ्यांना नेतृत्व म्हणत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, देशात दहशतवादी हल्ला झाला अन् पंतप्रधान प्रचार अन् अभिनेत्यांसोबत व्यस्त आहेत. सैन्याला तुम्ही बघा काय करायचे ते चांगले झाले तर श्रेय माझे, त्यात चूक झाली तर तुम्ही निर्णय घेतला होता, असे म्हणणाऱ्यांना नेतृत्व म्हणत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, युद्ध करायचे का नाही हा संपूर्ण राजकीय इच्छाशक्तीचा निर्णय असतो. जे होईल त्यांची जबाबदारी माझी असेल, असं म्हणणाऱ्यास नेतृत्व म्हटले जाते, जे इंदिरा गांधी यांचे होते. तुम्ही बघा तुम्हाला संपूर्ण अधिकार दिले आहे, तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो. श्रेय मी घेणार अन् चूक झाली तर तुम्ही निर्णय घेतला असे म्हणणाऱ्यास नेतृत्व म्हटले जात नाही, असा टोला संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना लगावला.
सरकार मोदींचं, सिस्टम मात्र राहुल गांधींची : संजय राऊत
जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जरी सरकारने घेतला असला तरी, या निर्णयाचं श्रेय देशातील जनतेनं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दिलं आहे. सरकार मोदींची आणि सिस्टम राहुल गांधींचं सुरू आहे. राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा सातत्याने धरून ठेवला होता. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. Rahul gandhi |





