समुपदेशक करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
Updated On:

करोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून उपाययोजना : पालकांत समाधान
पुणे – करोनाच्या विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांसह पालक शैक्षणिक परिस्थितीबद्दल संभ्रमात आहेत. अशा वेळेस विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तसेच करिअरविषयक मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकाच्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी 42 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून, ते विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 10 ते 5 या वेळेत भ्रमणध्वनीद्वारे जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक खालील समुपदेशकांची संपर्क साधू शकतात.






