Nagar | जमीन मोजणी खर्चाने आता मोजणीदाराचे मोडणार कंबरडे

अहिल्यानगर, – विधानसभा निवडणुकीनंतर पहिलाच दणका आता सर्वसामान्यांना शासनाने दिला आहे. जमीन मोजणीच्या दरामध्ये मोठी वाढ केली आहे. 1 डिसेंबरपासून या सुधारित दरांची अंतलबजावणी सुरू देखील झाली आहे. पूर्वीच्या दरांच्या शेतजमीन अथवा प्लॉटच्या मोजणी खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जमिनीच्या वादातून भांडण-तंटे वाढत असतानाच आता शेत, प्लॉट मोजणी खर्चाने शेतकरी व नागरिकांचे कंबरडे मोडणार आहे. पूर्वीचे साधी, तातडी, अतितातडी व अतिअतितातडी मोजणीचे चार संवर्ग रद्द केले असून आता दोनच नियमित व द्रुतगती मोजणी फी आकारण्यात येणार आहे.
शासनाने 1 नोव्हेंबरपासून या नव्याने मोजणी दराची अंमजबजावणीचा आदेश काढला होता. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे हा आदेश एक महिना उशीराने अंमलात येत आहे. यापूर्वी साधी, तातडी, अतितातडी व अतिअतितातडी असे मोजणीचे चार संवर्ग होते. प्रती दोन हेक्टर मोजणीत साधीसाठी 1 हजार, तातडीसाठी 2 हजार, अतितातडीसाठी 3 हजार तर अतिअतितातडीसाठी चारपट अशी मोजणीचे दर होते. त्यात आता बदल करून केवळ नियमित व द्रुतगती असे दोन मोजणीचे संवर्ग ठेवले आहेत. विविध क्षेत्रनिहाय असणार दरनवीन परिपत्रकानुसार मोजणी खर्चात वाढ झाली आहे. त्यासाठी विविध क्षेत्रनिहाय वर्गवारी ठरविण्यात आली आहे. मनपा हद्द व ग्रामीण हद्द असे वर्ग मोजणीसाठी करण्यात आले आहेत.
शेतजमीन मोजणीचे दरनियमित मोजणी : 2 हजार जलदगती मोजणी : 8 हजार 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असल्यास? दोन हेक्टर व त्यापेक्षा अधिक जमीन असल्यास नियमित 1 हजार रुपये व द्रुतगती दर चार हजार रुपये लागेल. व्यावसायिक भूखंड मोजणी दरव्यावसायिक भूखंड मोजणीसाठी नियमित 3 हजार व जलद गतीने भूखंड मोजण्यासाठी 12 हजार रुपये शुल्क लागेल. मनपा हद्दीतील क्षेत्राचा मोजणी दर अधिक. मनपा व नगरपालिकामध्ये असलेल्या क्षेत्रातील जमीन मोजणीसाठी शुल्क तीन हजार रुपये, जलद गतीचे शुल्क 12 हजार रुपये करण्यात येईल. एक हेक्टर मर्यादेपुढील जमिनीला नियमित शुल्क 1500 रुपये, तर जलद गतीसाठी सहा हजार रुपये लागतील.
महापालिका व नगरपालिका क्षेत्रात मोजणीचे दर तसे कमी झाले आहेत. यापूर्वी 10 गुंठ्यांसाठी दर होते ते आता एक हेक्टरचे दर झाले आहेत. त्यामुळे शहर भागातील नागरिकांना मोजणीचे दर कमी झाले आहेत. मात्र ग्रामीण भागात दर वाढले आहेत. जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत 4 हजार मोजणीचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी आतापयर्र्ंत दोन हजार अर्जदारांची मोजणी सुरू आहे. त्यांना जुन्याच दराने मोजणीचे दर आकारण्यात आले आहेत. मात्र 1 डिसेंबरपासून नव्याने मोजणीसाठी अर्ज करणार्यांना हे नवीन दर लागू होणार आहे. तसेच गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत सुरू झाली आहे. आता मोजणीदारांना ऑनलाईन अर्ज तर करावा लागणार आहे. पण ऑनलाईन नकाशा तोही अखांश व रेखांश सह दिला जाणार आहे.
मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत सुरू झाली आहे. काही जमीन मोजणी प्रकारात दर सवलत मिळाली आहे, तर काही जमिनीच्या वर्गवारीमध्ये अल्पशा प्रमाणात दरवाढ झालेली आहे. 2010 नंतर शासनाने दरवाढ केली आहे. नवीन दर प्रणाली 1 डिसेंबरपासून राज्यभरात लागू आहे. जिल्ह्यात 88 रोर्व्हर मशीन असून जमीन मोजणीचा वेग आता वाढला आहे.
– अविनाश मिसाळ
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख





