सत्तेविना तडफडणाऱ्या भाजपचा विवेक संपुष्टात आला- अशोक चव्हाण
Updated On:

मुंबई: कोरोनासारख्या महामारीतही भाजपला राजकारण सुचतं, हे दुर्दैव आहे. केंद्रातील जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने आरोप-प्रत्यारोप टाळून विधायक बाबींवर भर दिला. भाजपलाही महाराष्ट्रात असंच वागता आलं असतं. पण सत्तेविना तडफडणाऱ्या भाजपचा विवेक संपुष्टात आला आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे.
देशभरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामध्ये महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आज ‘माझे अंगण, माझे रणांगण’ आंदोलनाची हाक दिली आहे.
त्यानुसार आज राज्यभरात सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येणार आले. भाजपच्या नेत्यांनी राज्यभरात आपआपल्या घराच्या अंगणात, कार्यालयाबाहेर काळ्या फिती बांधून, ठाकरे सरकारविरोधातील घोषणांचे फलक हातात घेऊन निषेध व्यक्त केला.





