रवींद्र जडेजासाठी पुनरागमन खडतर
Updated On:

सिडनी : भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा मायदेशात होत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान शनिवारी जडेजाला दुखापत झाली आहे.
तिसऱ्या कसोटी दरम्यान, फलंदाजी करत असताना मिशेल स्टार्कचा चेंडू अंगठ्याला लागला होता. ही दुखापत पूर्ण बरी होण्यास किमान पाच आठवडे आवश्यक असल्याचे फिजीओंनी स्पष्ट केले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला 5 फेब्रुवारीपासून चेन्नई येथे सुरुवात होत आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबरमध्ये झालेल्या टी-20 मालिकेदरम्यानसुद्धा जडेजाला स्नायूंच्या दुखापतीमुळे दोन टी-20 सामने आणि पहिल्या दोन कसोटींना मुकावे लागले होते.
दरम्यान, आजच जडेजाच्या आंगठ्यावर शस्त्रक्रीया झाली असून लवकरच संघात परतणार,असा विश्वास जडेजाने व्यक्त केला आहे.





