पुणे शहरातही 38.2 अंश सेल्सिअसची नोंद
Updated On:

पुणे – राज्यात उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी काळात तापमानात वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पुणे शहरात आज गेल्या आठवडाभरातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. शहरात 38.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सरासरी तापमान वाढलेले असले तरी आगामी दोन दिवसात शहरातील तापमान पुन्हा 40 अंशाच्या आसपास पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.




