भरदुपारी चोरी, कपाटातील दागिने चोरीस
Updated On:

राहुरी – दुपारच्या वेळेस बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील दोन तोळे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना दि. २४ जून रोजी उंबरे येथे घडली. दुपारी १२ वाजे दरम्यान आप्पासाहेब दुशिंग यांच्या घरातील सर्वजण त्यांच्या घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दुपारी आप्पासाहेब दुशिंग हे घरी परत आले असता त्यांना घराच्या दरवाज्याचे कुलूप तुटून कोंडा वाकलेला दिसला. त्यांनी घरामध्ये जाऊन पाहणी केली असता लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले दिसले.
कपाटामधील ८ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुब्बे, ४ ग्रॅम वजनाचे कानातील वेल व १० ग्रॅम वजनाचे मनी मंगळसत्र असे एकूण दोन तोळे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. आप्पासाहेब कचरु दुशिंग यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.




