रायगड: आज शिवस्वराज्य यात्रेच्या चौथ्या टप्प्याला कर्जत, जिल्हा रायगड येथे सुरूवात झाली. सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे यांनी सभेत केले.
कर्जत येथील विकासासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने कायम प्रामाणिकपणे कामे केली आहेत, असे तटकरे म्हणाले. कर्जत-खोपोली रेल्वे दुहेरी ट्रॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे, कामे पूर्ण व्हावीत म्हणून कार्यकर्त्यांना उपोषण करावे लागत आहे, पण या सरकारला याचे गांभीर्य नाही, केवळ कॅबीनेट मंत्र्यांचे पगार काढण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री करतात, अशी टीका सुनिल तटकरे यांनी केली.