मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे असलेल्या ‘या’ विभागाची ढिसाळ कामगिरी; सगळ्यात खाली कुणाचा विभाग?

Mahayuti Government : मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शंभर दिवसांचा आढावा कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार केंद्र सरकारच्या क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया या कंपनीच्या वतीने प्रत्येक विभागाचे लेखापरीक्षण करण्यात आले. या मोहिमेचा उद्देश सर्व कार्यालये ऑनलाईन स्वच्छ, नागरिकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करणे, झिरो पेन्डेन्सी आदी कार्यक्रमाचा त्यामध्ये समावेश होता.
दरम्यान, पहिल्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आदिती तटकरेंकडे असलेला महिला व बालविकास आघाडीवर आहे. तर सार्वजनिक बांधकाम विकास दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपचे तीन विभाग टाॅप पाचमध्ये आहेत. तर 48 विभागातील तीन विभाग नापास झाले आहेत. सामान्य प्रशासन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि नगर विकास विभागांची ढिसाळ कामगिरी असल्याचे समोर आले आहे. याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेला सामान्य प्रशासन विभाग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभाग आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणारा अन्न-नागरी पुरवठा विभागाची ढिसाळ कामगिरी झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाला फक्त 24 टक्के, नगरविकास विभागाला 34 टक्के मार्क, तर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला 33 टक्केच गुण मिळाले आहे.
भाजपचे दोन मंत्री गुणवत्ता यादीत
पहिल्या पाच जणांमध्ये भाजपच्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये जयकुमार गोरे यांचा ग्रामविकास विभाग ६३.८५ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर, पाचव्या स्थानावर नितेश राणे यांचा बंदरे विभाग आहे. यासोबत प्रताप सरनाईक यांचा परिवहन विभाग देखील ६१.२८ गुणांसह नितेश राणेंच्या विभागासह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे.
क्रमांक कार्यालयाचे नाव गुण (१०० पैकी)
महिला व बाल विकास विभाग ८०
सार्वजनिक बांधकाम विभाग ७७.९५
कृषी विभाग ६६.१५
ग्राम विकास विभाग ६३.८५
पहिवहन व बंदरे विभाग ६१.२८
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी सर्वोत्तम
चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना १०० पैकी ८४.२९ टक्के गुण
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी ८१.१४ टक्के गुणांसह द्वितीय
जळगावचे जिल्हाधिकारी ८०.८६ टक्के गुणांसह तृतीय स्थानी
अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौथ्या क्रमांकाचे ७८.८६ टक्के गुण
नांदेडचे जिल्हाधिकारी पाचव्या क्रमांकावर,६६.८६ टक्के गुण
पाहा संपूर्ण यादी





