“राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाला साजेसं असं काम छत्रपती कुटुंबाने केलं नाही”; वीरेंद्र मंडलिकांची टीका

Kolhapur Lok Sabha Election 2024| कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्याबाबत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर आता संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनीही छत्रपती घराण्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम केलं नाही. छत्रपती कुटुंबिय राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने एकही उद्योग काढू शकले नाहीत,’ असे विधान वीरेंद्र मंडलिक यांनी केले आहे.
काय म्हणाले वीरेंद्र मंडलिक ? Kolhapur Lok Sabha Election 2024|
काल भाजपचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागल येथे कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक तसेच समरजितसिंह घाटगे याची उपस्थिती होती. यावेळी बोलताना वीरेंद्र मंडलिक यांनी छत्रपती घराण्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“या कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आपल्या सर्वांसाठी दैवत आहेत. त्यांचं जनक घराणं म्हणून समरजीत घाटगे यांच्याकडे आम्ही पाहतो. मात्र छत्रपती घराण्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाला साजेसं असं काम केलं नाही. छत्रपती घराण्यातील त्यांचा एक उद्योग दाखवा, ज्याचे नाव त्यांनी शाहू ठेवले आहे. १२ ते १५ वर्षांपासून बंद पडलेली शाहू मिल देखील त्यांना सुरू करता आलेली नाही,” वीरेंद्र मंडलिक म्हणाले .
“उलट समरजीत घाटगे हे शाहू साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चालवत आहेत आणि त्याचे आदर्श आमच्यासारखे कारखानदार घेतात. म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे खरे जनक वारसदार समरजीत घाटगे तुम्ही आहात, ” असे म्हणत वीरेंद्र मंडलिक यांनी छत्रपती घराण्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे
संजय मंडलिक यांचेही वादग्रस्त विधान Kolhapur Lok Sabha Election 2024|
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती अशी लढत होत आहे. सध्या दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही-आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असे विधान संजय मंडलिक यांनी केले होते. यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
हेही वाचा:
महायुतीत नाराजीनाट्य ! राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवारांच्या विरोधात





