Auction mineral blocks : केंद्र सरकार फेब्रुवारीत करणार 6 खाणींचा लिलाव

नवी दिल्ली – सरकार चालू महिन्यात चार लोह खनिज खाणींसह एकूण सहा खनिज खाणी विक्रीसाठी ठेवणार असून त्याची विक्री लिलावाद्वारे केली जाणार आहे. (Govt may auction 6 mineral blocks in February) या निर्णयामुळे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात खाण क्षेत्राच्या योगदानाला चालना मिळेल.
खाण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, छत्तीसगडमध्ये असलेल्या चार लोहखनिज ब्लॉक्सचा मंगळवारी लिलाव होण्याची शक्यता आहे. चित्पुरी बी लोहखनिज ब्लॉक, गोमटेर वाकेली, विजापूर, हहलाद्दी, उत्तर बस्तर कांकेर, या खाणींसाठी निविदा मागवणारी नोटीस गेल्या वर्षीच काढण्यात आली होती.
निकेल, कोबाल्ट, तांबे, शिसे आणि संबंधित खनिजे असलेल्या आंध्र प्रदेशातील बंदियामोट्टू ब्लॉकचा लिलावही फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. या ब्लॉकसाठी निविदा मागवणारी नोटीस गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जारी करण्यात आली होती.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/we-will-win-all-lok-sabha-seats-in-maharashtra-amit-shah/
खनिज खाणींच्या लिलावासाठी 2015 मध्ये नवीन प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 239 खाणींचा लिलाव करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 85 खाणी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, तर गेल्या आर्थिक वर्षात 46 खाणींचा लिलाव करण्यात आला आहे.





