केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले : बाळासाहेब शिवरकर

Updated On:

हडपसर – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार संकुचित असून त्यांनी पक्ष, देश ,पार्टी या पेक्षाही स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्याचे काम केले आहे. खोटी आश्वासने देऊन सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे.ही वाढती महागाई रोखण्यासाठी काँग्रेस सत्तेत असल्याशिवाय पर्याय नाही. असे मत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केले.

हडपसर व वानवडी काँग्रेस कमिटीच्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या नेतृत्वाखाली हडपसर गांधी चौक ते गिरमे चौक अशी दुचाकी रॅली काढून वानवडी येथील जांभूळकर गार्डन येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश काँग्रेसचे युवक सरचिटणीस अभिजित शिवरकर, ब्लॉक अध्यक्ष प्रशांत मामा तुपे, , नितीन आरु, विजय जाधव, बाळासाहेब गोंधळे, गणेश फुलारे, दिलीप शंकर तुपे, शंभू जांभुळकर, सुलतान खान, सुभाष सरोदे, पुष्पा गायकवाड, इंदिरा तुपे, बाळासाहेब टिळेकर, स्वप्निल डांगमाळी,वैभव डांगमाळी, अजित ससाणे, बाळासाहेब हिंगणे, प्रकाश पवार, संजय डोंगरे, अमीन शेख, दत्ता डुरे, इम्रान शेख, दीपक गुप्ता, दिनशे गिरमे, गणेश कवडे, राजू शिंदे, दादा मगर आदींसह हडपसर व वानवडी परिसरातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.
हडपसर : माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या नेतृत्वाखाली हडपसर व वानवडी काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

आणखी संबंधित बातम्या

Holystico Astrana : होलिस्टिको अ‍ॅस्ट्रानाला ‘लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इयर’ पुरस्कार

2026-09-11 16:28:37

Holystico Astrana : होलिस्टिको अ‍ॅस्ट्रानाला ‘लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इयर’ पुरस्कार

Pune : पुणेकरांनो, उद्या 2 तास हा महत्त्वाचा रस्ता बंद! दिवेघाटात ब्लास्टिंग; जाण्यापूर्वी पर्यायी मार्ग पाहा

2026-09-10 22:48:48

Pune : पुणेकरांनो, उद्या 2 तास हा महत्त्वाचा रस्ता बंद! दिवेघाटात ब्लास्टिंग; जाण्यापूर्वी पर्यायी मार्ग पाहा

Hadapsar : सिलेंडरचा स्फोट; हडपसरमध्ये भीषण आग, आठ घरे जळून खाक

2026-09-10 22:42:41

Hadapsar : सिलेंडरचा स्फोट; हडपसरमध्ये भीषण आग, आठ घरे जळून खाक

Pune News : साडेसतरानळी येथील शेतकरी व ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात; अमनोरा पार्क टाऊनशिपमधील प्रलंबित प्रश्नांवर शेतकऱ्यांची बैठक

2026-09-08 10:13:26

Pune News : साडेसतरानळी येथील शेतकरी व ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात; अमनोरा पार्क टाऊनशिपमधील प्रलंबित प्रश्नांवर शेतकऱ्यांची बैठक

Pune Traffic Changes : हडपसरमध्ये दहीहंडीमुळे वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग पाहा

2026-09-05 15:57:29

Pune Traffic Changes : हडपसरमध्ये दहीहंडीमुळे वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग पाहा