कोरोनामुळे इटलीत तबाही
Updated On:

नवी दिल्ली : चीन नंतर इटलीत कोरोना विषाणूने सर्वाधिक थैमान घातले आहेत. या विषाणूमुळे इटलीत दीड हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्व इटलीत वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. इटलीचे प्रधानमंत्री जुजपे कॅन्टो यांनी नागरिकांच्या प्रवासावर बंदी घातली आहे.
मात्र अत्यावश्यक कामाला त्यातून वगळण्यात आले आहे. खूप महत्वाचे काम असेल तरच नागरिक घराबाहेर पडू शकतात. आरोग्यासंबंधित तक्रार असेल तरच इटलीतील नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे.
इटलीत येण्या-जाण्यासाठी नागरिकाना परवानगी घ्यावी लागणार आहे. जर खोटं बोलून नागरिकांनी परवानगी घेतली तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री जुजपे कॅन्टो यांनी नागरिकांना आवाहन केल्या नंतर नागरिकांनी गरजेचे साहित्य घेण्यासाठी मॉल्समध्ये गर्दी गेली आहे.





