बंदुकीच्या धाकाने कार पळवली
Updated On:

सातारा – बंदुकीच्या धाकाने नवनाथ नामदेव भुजबळ (रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांची कार पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि. 21) पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर घडली. याप्रकरणी सागर (पूर्ण नाव माहिती नाही) आणि त्याच्या तीन साथीदारांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, भुजबळ यांचा गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. सागरने कारबाबत मोबाइलवरून बोलणी केल्याने भुजबळ यांचे मित्र इसाक इनामदार व संकेत वैद्य हे महिंद्रा स्कॉर्पिओ (एमएच-10-एयू-1441) घेऊन मंगळवारी (दि. 21) साताऱ्यात आले होते. इनामदार व वैद्य हे बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून सेवा रस्त्याने कोल्हापूरकडे निघाले असता, संशयितांनी त्यांच्या डोक्याला बंदूक लावून कार बळजबरीने नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे तपास करत आहेत.





