‘दि कान्स’ चित्रपट महोत्सव: बॅालीवूड स्टार्सचं रेड कार्पेटवरून रॅम्प वॅाक! उर्वशी रौतेलाच्या लूकची होतेय चर्चा, जाणून घ्या….

The Cannes Film Festival 2025 :अॅास्कारनंतर दुसरा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘दि कान्स’ चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली आहे. काल दि. १३ मे पासून ते २४ मे पर्यंत हा चित्रपट फ्रान्समंध्ये पार पडणार आहे. नुकतीच या संदर्भात दि कान्स चित्रपट महोत्सवाच्या सदस्यांनी पत्रकार परिषेद याबद्दल माहिती दिली.
कान्स चित्रपट महोत्सव हा जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे, जो दरवर्षी फ्रान्समधील कान्स येथे आयोजित केला जातो. या चित्रपट महोत्सवात जगभरातून आलेले अनेक चित्रपट दाखवले जातात. यंदाचे कान्सचे ७३ वे वर्ष असून यंदाही मोठ्या दमाखदार पद्धतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हॅालीवूडप्रमाणे बॅालीवूड स्टार्सचाही रेड कार्पेटवर अवतरणार पाहायला मिळत आहे.
नुकतीच अभिनेत्री उर्वशी रौतेलाने कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली. यावेळी तिने अॅाफ शोल्डर गाऊल परिधान केला होता. तिच्या या लूकमधील ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यासोबतच तिने क्रिस्टल पॅरट क्लच घेतला होता. तिच्या या लूकची खूप चर्चा झाली. उर्वशीच्या क्लचची किंमत सुमारे ४.५० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दरवर्षीप्रमाणे याही वेळी कान्स २०२५ मध्ये सहभागी होणार आहे.ऐश्वर्या राय व्यतिरिक्त, जान्हवी कपूर, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा आणि दीपिका पादुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ चा भाग असणार आहेत. २४ मे पर्यंत चालणाऱ्या कान्सच्या उद्घाटन समारंभात अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि दिग्दर्शिका पायल कपाडिया चर्चेचा विषय होते.
कान्सचं महत्व
कान्स चित्रपट महोत्सवाचे प्राथमिक लक्ष चित्रपट उद्योगातील व्यावसायिकांवर असले तरी, उद्योगाबाहेरील व्यक्तींना काही स्क्रीनिंग आणि कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य आहे. हा महोत्सव व्यावसायिक, चित्रपट प्रेमी आणि सामान्य जनतेला ओळख प्रदान करतो. याव्यतिरिक्त, सार्वजनिक प्रदर्शने आणि सिनेमा डे ला प्लेज (बीच सिनेमा) सारखे उपक्रम देखील आहेत जे सर्वसामान्यांसाठी खुले आहे.
पुरस्कारांबद्दल..
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या बक्षीस रकमेचे तीन ज्युरी पुरस्कार निश्चित करतात. विजेत्यांना पहिल्या बक्षिसासाठी €१५,०००, दुसऱ्या बक्षिसासाठी €११,००० आणि तिसऱ्या बक्षिसासाठी €७,५०० चे अनुदान मिळेल. संयुक्त निवाड्याच्या बाबतीत, रक्कम समान प्रमाणात विभागली जाणार आहे.
हे भारतीय चित्रपट दाखवले जाणार
या महोत्सवात ५ भारतीय चित्रपटही दाखवले जाणार आहेत. ‘होमबाउंड’, ‘अरणेयर दिन रात्री’ (१९७०), ‘चरक’, ‘तन्वी द ग्रेट’ आणि ‘अ डॉल मेड ऑफ क्ले’ अशी या चित्रपटांची नावे आहेत. याशिवाय, ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ फेम दिग्दर्शिका पायल कपाडिया या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी म्हणून दिसणार आहेत. कपाडिया कान्समध्ये सहभागी होण्यासाठी रेड कार्पेटवरही पोहोचली असून यादरम्यान, ती ज्युलिएट बिनोचे, जेरेमी स्ट्रॉंग, हॅले बेरी, अल्बा रोहरवाचर, डियुडो हमादी, कार्लोस रेगाडास सारख्या स्टार्ससोबत पोज देताना दिसली.





