पिंपरी | संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी, (प्रतिनिधी) – सामाजिक संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी सोमवारी (दि. २८) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चिंचवड विधानसभेतून त्यांनी अपक्ष आणि स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले.
अर्ज भरण्यापूर्वी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, मोरवाडी चौकातील राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून भव्य रॅलीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा कार्याध्यक्ष लहू लांडगे, जिल्हा सचिव गणेश कुंजीर, जिल्हा उपाध्यक्ष विजय क्षीरसागर, जिल्हा संघटक अक्षय गायकवाड, पुणे शहराध्यक्ष प्रशांत कुंजीर,
पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष दिनेश मराठे, उपाध्यक्ष गणेश मस्के पाटील, संघटक प्रवीण पाटील, सुधीर जाधव, नानासाहेब सकुंडे, संतोष माने, निलेश शेंडगे, सलीम मुलानी, विशाल ढगे, संतोष भोईर आदींच्या उपस्थितीत काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.




