“आम आदमी पक्ष संपवण्याची मोहीम सुरू, त्यासाठी..” CM केजरीवालांचा केंद्र सरकारवर निशाणा

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Cm arvind kejariwal) यांनी बुधवारी आरोप केला की केंद्र सरकारकडून सध्या आम आदमी पार्टीला (AAP) संपवण्याची मोहीम सुरू आहे आणि त्यासाठीच पक्षाच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आत्तापर्यंत आम आदमी पक्षाच्या 170 नेत्यांवर खटले दाखल करण्यात आले असून त्यातील 140 प्रकरणांचा निकाल आमच्या बाजूने लागला आहे असेही केजरीवालांनी म्हटले आहे.
मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आपचे आमदार अमानुत्तल्लाखान यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते, त्यानंतर अमानतुल्ला खान यांनी केजरीवालांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना केजरीवालांनी हा आरोप केला आहे. ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत त्यांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांना आणि मंत्र्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे.
छापे टाकले जात आहेत ते आमचा पक्ष संपवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग आहे भाजपशासित राज्यांमध्ये ईडी किंवा केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडून कोणतीही चौकशी होत नसल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. ते म्हणाले की भाजपचा (bjp) हेतू देशातील भ्रष्टाचार संपवणे हा नाही तर विरोधकांना त्रास देऊन त्यांना संपवणे हाच त्यांचा मुख्य हेतू आहे.
मोदी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतात त्यांनाच आपल्या पक्षात घेतात असेही ते म्हणाले. देशातील दहशतीच्या वातावरणामुळे लोक मोठ्या प्रमाणात देशसोडून देशबाहेर जात आहेत असा दावाही केजरीवालांनी केला.





