Asim Sarode : ‘धनुष्यबाण गोठवलं जाईल, शिवसेना ठाकरेंना परत दिली जाईल’; प्रसिद्ध वकिलाच्या दाव्याने खळबळ
Asim Sarode : सुनावणीत कपिल सिब्बल सातत्याने उबाठा गटाची बाजू भक्कंमपणे मांडत आहेत. त्यांच्याकडून न्यायालयात जोरदार व्यक्तीवाद सुरू आहे. विधिमंडळ आणि राजकीय पक्ष याबाबत बोलताना त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार व्युक्तिवाद केला होता.

Asim Sarode : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर सर्वेाच्च न्यायालयात सुनावणी पार पडत आहे. आजही या प्रकरणी सुनावणी होणार असून याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत जोरदार व्यक्तिवाद करत आहेत. यामुळे चिन्ह आणि पक्ष पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येईल अशी आशा पल्लवीत झाली असतानाच प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे.
‘धनुष्यबाण गोठवलं जाईल, शिवसेना ठाकरेंना परत दिली जाईल’ असा दावा असीम सरोदे यांनी केला आहे. एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखत ते म्हणाले, “धनुष्यबाण हे आता गोठवून टाकलं जाईल. म्हणजे एकनाथ शिंदेही वापरणार नाहीत, कदाचित उद्धव ठाकरेही वापरणार नाहीत. शिवसेना हा पक्ष त्यांना परत दिला जाईल. आणि मग एकनाथ शिंदे कोणते तरी नवीन चिन्ह घेतील किंवा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील.” त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय म्हणाले असीम सरोदे?
“आपल्याला या महिनाभरामध्ये, पुढचा निकाल येईल असं मला नक्की वाटतं. आणि सत्याचा विजय झालाच पाहिजे. हे इतकं दबाव किंवा प्रेशर आलेलं आहे म्हणजे नैतिकतेचा दबाव आला आहे सुप्रिम कोर्टावर की सत्याचा विजय म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा विजय. सत्याचा विजय म्हणजे मूळ शिवसेना जिंकली पाहिजे याचा विजय. त्यामुळे हे जे चिन्ह आहे, धनुष्यबाण हे आता गोठवून टाकलं जाईल. म्हणजे एकनाथ शिंदेही वापरणार नाहीत, कदाचित उद्धव ठाकरेही वापरणार नाहीत. शिवसेना हा पक्ष त्यांना परत दिला जाईल. आणि मग एकनाथ शिंदे कोणते तरी नवीन चिन्ह घेतील किंवा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील.”
सुनावणीत काय काय घडलं?
सुनावणीत कपिल सिब्बल सातत्याने उबाठा गटाची बाजू भक्कंमपणे मांडत आहेत. त्यांच्याकडून न्यायालयात जोरदार व्यक्तीवाद सुरू आहे. विधिमंडळ आणि राजकीय पक्ष याबाबत बोलताना त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार व्युक्तिवाद केला होता. बुधवारी पार पडलेल्या सुनावणीवेळी एकनाथ शिंदे यांना त्यावेळी फक्त आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्रिपद देण्यात आलं, मुख्यमंत्रिपद देताना सत्य काय ते तपासण्यात आलं नाही, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड बेकायदेशीर होती, असा युक्तिवाद केला. आता आज पुन्हा एकदा सर्वेाच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार असून, या सुनावणीत काय घडते याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Irregular Periods: पीरियड्स वेळेवर का येत नाहीत? ‘ही’ कारणं असू शकतात जबाबदार






