पुणे जिल्हा |हद्दीच्या वादाचे रस्त्यालाही ग्रहण

आळंदी, (वार्ताहर) – आळंदी-चाकण रस्त्यावर आळंदी हद्दीच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर असणारा सार्वजनिक रस्ता रहिवासी झोन व व्यंकटेश मंगल कार्यालयाकडे जातो. सुमारे 500 मीटर लांबीच्या या रस्त्यावर केळगाव ग्रामपंचायत व चर्होली खुर्द ग्रामपंचायत दोन्ही ग्रामपंचायतीची हद्द येत असून यामुळे तो रस्ता आजवर दोन्ही ग्रामपंचायतीच्या हद्दीवादावरून कात्रीत सापडला आहे. मात्र त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरून येता जाता कमालीची कसरत करावी लागते.
स्थानिक नागरिकांचे असे म्हणणे आहे की, आपापल्या हद्दीतील रस्ता हा त्या त्या ग्रामपंचायतीने करून द्यावा आम्ही वार्षिक कर नियमित वेळेवर भरत असतो तरी याचा अंतर्गत वाद बाजूला ठेवून एकमेकांच्या सहकार्याने सदरील रस्ता डांबरीकरण करून द्यावा, अशी रहिवाशांची मागणी आहे.
येथे काही वर्षांपूर्वी फ्लॅट धारकांनी जागा विकल्या; परंतु घेणार्याला वरील रस्त्याची खरी वस्तूस्थिती न सांगितल्याने आज त्यांना या गोष्टीस सामोरे जावे लागत आहे. चाकण-आळंदी रस्ता (ता. खेड) : रहिवासी झोनमध्ये अंतर्गत जाणारा रस्ता हा दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीवादात कात्रीत सापडला आहे.





