मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील भयानक सत्य समोर येताच स्वरा भास्कर संतापली

Swara Bhasker Post | बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर विविध मुद्दयांवर नेहमीच आपले परखड मत मांडताना दिसते. यामुळे अनेकदा तिच्यावर टीका देखील होताना दिसते. नुकताच न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल समोर आला असून, त्यानंतर मल्याळम इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. आता स्वरा भास्करने हा रिपोर्ट वाचून प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने सिने इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे.
लैंगिक शोषणाच्या आरोपांनी घेरलेल्या मल्याळम फिल्म इंडस्ट्रीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना स्वरा तिच्या पोस्टमध्ये लिहिते, ‘हेमा समितीचा अहवाल वाचण्याची मला अखेर संधी मिळाली. सर्वप्रथम, मी विमेन इन सिनेमा कलेक्टिव्ह (WCC) बद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छिते जी सतत महिलांच्या हिंसा आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवते.”
स्वरा भास्कर तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिते, ‘या समितीचा अहवाल वाचून माझे मन दु:खी झाले आहे. समितीचे निष्कर्ष वाचणे हृदय पिळवटून टाकणारे आहे. या घटनांचे तपशील वेगळे असू शकतात, परंतु मला या सर्व घटनांची चांगलीच माहिती आहे.
View this post on Instagram
पुढे ती लिहीते की, ‘वीरे दी वेडिंग’ अभिनेत्रीने स्पष्ट केले की, जर तुम्ही शोबिझच्या व्यवसायातील चुकीच्या विरोधात आवाज उठवला तर तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. शोबिज हा केवळ पितृसत्ताक नसून एक परंपरावादी उद्योग आहे. इथे यशस्वी अभिनेते आणि दिग्दर्शकांची तुलना देवाशी होऊ लागते. त्यांनी काहीही चूक केली तरी सर्व काही माफ आहे.” यात स्वरा भास्करनेही इंडस्ट्रीसाठी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. स्वराने अनेक यशस्वी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनाही टार्गेट केले आहे.
हेमा समितीचा 296 पानांचा अहवाल 19 ऑगस्ट रोजी सार्वजनिक झाला. यामध्ये कास्टिंग काउच आणि त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक छळाबद्दल अनेक महिलांनी उघडपणे बोलले आहे. काम देण्याच्या बदल्यात अभिनेत्रींकडून अनैतिक मागण्या केल्या जात असल्याचा आरोप मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील अनेक महिलांनी केला आहे. हेमा समितीच्या अहवालात चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महिलांवर लैंगिक शोषणासाठी दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे.
स्वरा भास्करच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच काळापासून पडद्यापासून दूर आहे. तिने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये फहाद अहमदशी लग्न केले आणि सप्टेंबरमध्ये ती एका मुलीची आई झाली.





