इमरान हाश्मीच्या ‘द बॉडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ
Updated On:

मुंबई – बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीचा आगामी चित्रपट द बॉडी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रीलर असून यामध्ये अनेक कलाकारांनी भूमिका साकारली आहे. अभिनेते ऋषि कपूर यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.
पटात वेदिका आणि सोभिता धूलिपाला या अभिनेत्रींनीही काम केले आहे. ट्रेलर पाहूनच प्रेक्षकांची उत्कंठता शीगेला पोहचली आहे. क्राईम मिस्ट्री थ्रिलर या प्रकारात मोडणारा हा चित्रपट असून, चित्रपटात अनेक हॉरर दृश्ये पहायला मिळणार आहेत. 13 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





