वॉशिंग मशीन का काला जादू ! भाजपच्या विरोधात आपची अनोखी प्रचार मोहीम

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने मंगळवारी देशातील परिस्थितीबद्दल सामान्य लोकांना माहिती देण्यासाठी ‘वॉशिंग मशीन का काला जादू’ ही अभिनव प्रचार मोहीम सुरू केली,आहे.
या मोहीमेच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळी, आप दिल्लीचे राज्य संयोजक गोपाल राय म्हणाले की, भाजप दावा करत आहे की ते भ्रष्टाचाराच्या विरोधात निवडणूक लढत आहेत, परंतु आम्ही लोकांना या दाव्यांचे सत्य सांगू.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अजित पवार, अशोक चव्हाण आणि हिमंता बिस्वा सरमा यांसारख्या लोकांना पक्षात घेऊन भाजपने त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच सत्तेची महत्वाची पदे दिली.
या प्रकरणी भाजपला लक्ष्य करण्यासाठी विरोधी पक्ष अनेकदा “वॉशिंग मशीन”हा शब्द वापरतात. हे यंत्र कसे काम करते याचे प्रात्यक्षिक सादर करून दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की,
शारदा घोटाळ्यात हिमंता बिस्वा सरमा यांचा सहभाग असल्याचा आरोप करत भाजपने सहा महिने मोहीम चालवली होती. पण नंतर त्यांचा भाजपमध्ये समावेश करण्यात आला आणि त्यांची सर्व पापे धुतली गेली,असेच बाकीच्याही सर्व भ्रष्ट नेत्यांच्या बाबतीत झाले असा आरोप त्यांनी केला.





