zilla parishad election – सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात भाजपने जिल्हा परिषदेत 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. 50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपने 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. या ठिकाणी शिंदेसेनेला 14 जागा, तर ठाकरेसेनेला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत. 6 अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवत काही ठिकाणी चुरशीचे राजकारण दाखवून दिले आहे. तसेच १०० जागा असलेल्या पंचायत समितीत भाजपने 60 जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शिंदेसेना 27 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी ठाकरेसेनेला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद – एकूण जागा : 50 भाजप पक्ष : 27 शिंदेसेना पक्ष : 14 ठाकरेसेना पक्ष : 3 अपक्ष : 6