मोठी बातमी..! सातारा डॉक्टर मृत्यू प्रकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती; तपासाला वेग येणार?

Satara doctor death case : साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात सतत नवे खुलासे होत असून, ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहे. पीडितेच्या हातावर आणि सुसाइड नोटमधील हस्ताक्षर जुळत नसल्याचा दावा अंधारे यांनी केला असून, हा आत्महत्येचा की हत्येचा प्रकार आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.
दुसरीकडे पोलिसांत हजर झालेल्या बदने याने त्याचा मोबाईल पोलिसांकडे जमा केला नव्हता. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्या मोबाईलचा शोध पोलिसांकडू सुरु होता. त्यानंतर आज पीएसआय गोपाळ बदने याचा मोबाईल पोलिसांना सापडला आहे.
अखेर बदनेचा मोबाईल सापडला
साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपळ बदने या दोघांची चौकशी सुरु आहे. डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतर पीएसआय गोपाळ बदने फरार झाला होता. घटनेनंतर त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूरमध्ये आढळलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी आरोपी बदने स्वत: फलटण पोलीस स्टेशनला हजर झाला होता.
मात्र बदने याने त्याचा मोबाईल पोलिसांकडे जमा केला नव्हता. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्या मोबाईलचा शोध सुरु होता. मात्र, आज बदने याचा मोबाईल पोलिसांना सापडला असून त्याच्या नातेवाईकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात मोबाईल जमा केला आहे. बदनेच्या मोबाईलमुळे डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात तपासाला वेग येणार असल्याचे बोलले जात आहे.
सुषमा अंधारे यांचा खळबळजनक दावा
पीडितेच्या हातावर पोलीस निरीक्षकाने लिहिलेल्या ‘निरीक्षक’ शब्दात पहिली वेलांटी आहे, तर सुसाइड नोटमध्ये हाच शब्द नऊ वेळा लिहिला असून त्याला दुसरी वेलांटी देण्यात आली आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी करत दोन्ही हस्ताक्षरांचे फोटोही दाखवले आहे, त्यामुळे या नवे वळण लागण्याची शक्यता आहे.





