मराठमोळ्या अभिनेत्याने शेअर केला कोकणातील भात लावणीचा अनुभव

Actor Abhijeet Kelkar | बिग बॉस मराठी फेम अभिनेता अभिजीत केळकर कोकणात पोहचला आहे. पावसाळा म्हंटलं की अनेकजण कोकणातील निसर्गरम्य वातावरणात आनंद लुटतात. यातच आता अभिजीत केळकर देखील कोकणातील भात लावणीचा आनंद लूटताना दिसत आहे. नुकतेच त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिजित अलिबाग येथे त्याच्या मित्राच्या गावी पावसाचा आनंद घेत भात लावणी करताना दिसत आहे.
यावेळी अभिजीत म्हणतो, “मी कोकणातला आहे आणि या गोष्टीचा मला कायमच खूप अभिमान आहे. पण तसं असूनही इतक्या वर्षांमध्ये पावसाळ्यात कोकणात येण्याची संधी मिळाली नाही, तशी कधी वेळही आली नाही. कारण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बिझी असायचो. पण यावेळी मी आणि माझ्या मित्राने ठरवलं होतं. त्याचं अलिबागजवळ छोटसं गाव आहे तिथे एक देऊळ आहे, तर तिकडे आम्ही आलोय. पावसाचा मनमूराद आनंद लूटतोय. त्याचबरोबर आम्ही इथे लावणीचा प्रत्यक्ष शेतात येऊन आनंद घेतला.”
View this post on Instagram
पुढे अभिजीत केळकर म्हणतो,”हिरवंगार गवत हातात घेतल्यानंतर त्याचा अनुभव कसा असतो. शिवाय इतका पाऊस माती पायाला मऊ कशी लागते, याचा स्वर्गीय आनंद कोकणात येऊन उपभोगला. तसेच इथे येऊन या सगळ्या लोकांचं प्रेम अनुभवलं”. त्याचबरोबर अभिजीतने गुरांना पाणी पाजतानाचा व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. या व्हिडिओ शेअर करत त्याने ‘कोकणातल्या गावासारखं सुख नाही’ असं कॅप्शन लिहिलं आहे.
अभिजीतच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं तर, ‘बिग बॉस मराठी’मध्ये तो पाहायला मिळाला होता. त्याचबरोबर तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेमध्ये दिसला होता.
हेही वाचा:
‘मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना…’ ; संजय सिंह यांचा केंद्र, भाजप अन् एलजीवर मोठा आरोप





