“बुरे काम का बुरा नतीजा, सुनभाई चाचा आ भतीजा”

शेरो शायरीद्वारे मुख्यमंत्र्यांची बारामतीत टोलेबाजी 

बारामती: ‘बुरे काम का बुरा नतीजा सुनभाई चाचा आ भतीजा’ तसेच ‘हम मोदी जी के  बाशिंदे हमारा आवाज कोई बंद नही कर सकता’ ‘ अशा प्रकारची शेरोशायरी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाना साधला आहे. पुणे जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी पक्षात कोणी थांबायला तयार नाही अशी खिल्ली देखील त्यांनी यावेळी उडवली. बारामतीत मला परिवर्तनाची हवा दिसत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला असून, फडणीस यांनी यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वर हल्लाबोल केला आहे. पंधरा वर्षात आघाडी सरकारने जेवढे काम केले नाही त्याच्या दुप्पट काम सरकारने केली असल्याचे सांगत पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखा जोखा मुख्यमंत्र्यांनी बारामतीच्या महाजनादेश यात्रेत  मांडला.

तसेच मजबूत राष्ट्राची उभारणी करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केले मात्र जम्मू-काश्मीरच्या विलीनीकारणाकरिता राष्ट्रवादीने मतदान का केले नाही असा सवालही त्यांनी यावेळी शरद पवार यांना केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,  माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील ,राज्यमंत्री संजय भेगडे, खासदार अमर साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.