‘साथ दे तू मला’ मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकांची पसंती
Updated On:
स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या ‘साथ दे तू मला’ या मालिकेला आणि मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. अवघ्या काही दिवसांत या मालिकेच्या शीर्षकगीताला १० लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडिओ दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिलाय.
https://youtu.be/Jzlow175P0g
राहुल वैद्य आणि केतकी माटेगावकरने हे शीर्षकगीत गायलं असून सुप्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीरने या गाण्याला संगीत दिलं आहे. गीतकार श्रीपाद जोशींनी हे गाणं लिहिलंय.





