वातावरण खेळतं राहावं म्हणून वर्षासहल; पण घडलं भलतच… कसबा-कोथरूड खडाजंगीची शहरभर जोरदार चर्चा

Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून शहरात जोरदार तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपने जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची नियुक्ती केली. पुणे शहराची जबाबदारी पुन्हा एकदा धीरज घाटे यांच्यावर सोपविण्यात आली.
येत्या काही दिवासांमध्ये महामालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल, त्यापूर्वी पक्षातील वातावरण खेळतं राहावे आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे, यासाठी भाजपकडून वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सहलीत अशी एक घटना घडली त्याची शहरात जोरदार चर्चा केली आहे.
कसबा पेठ मतदारसंघातील एका माजी नगरसेवकाचे आणि कोथरूडमधील एक महत्वाच्या पदाधिकारी यांच्यात जोरदार वाद झाला. सुरूवातील चेष्टा मस्करी झाली. मात्र नंतर याचं वादात रुपांतर झालं. पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोघांमधील वादामध्ये वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे पुढे होणारा मोठा वाद थांबला. या वादाची शहरात मोठी चर्चा केली जात आहे. मात्र, शहराध्यक्षांनी असा कोणताच वाद घडलेला नसल्याचे सांगितले आहे.
नेमकं काय घडलं?
बुधवारी शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी भाजपच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची वर्षा सहल आयोजित केली होती. त्यानुसार शहर कार्यालयात 200-250 जणांचा ताफा तयार झाला. पक्षातील वातावरण खेळत राहावं या वर्षासहलीचे आयोजन करण्यात आले होते. ठरल्यानुसार पुण्यातून मुळशीच्या दिशेने सगळे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक निघाले. वाटेत एका फार्म हाऊसवर जेवण केलं. त्यानंतर पुढे एका रिसार्टवर गेले. तिथे ट्रॅक्टरवर एक फेरफटकारा देखील मारला. यावेळी रिमझिम पाऊस सुरू होता. यावेळी हास्यविनोद आणि गप्पांची मैफिल जोरदार रंगली होती.
थट्टा मस्करी अन् वाद
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील एका माजी नगरसेवकाचे आणि कोथरूडमधील एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याची थट्टा मस्करी सुरू होती. अचानक याचं वादात रुपांतर झालं. हा वाद वाढतच गेला आणि दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. सुदैवाने तिथे उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यांनी दोघांनाही वेळेच शांत केले. या वादाबद्दल शहराध्यक्षांनी सहलीमध्ये असा कोणताही प्रकार घडला नाही, असे सांगितले आहे, पण शहरात मात्र या वादाची जोरदार चर्चा होत आहे.





