पुणे जिल्हा | पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे घोड्यावरून आगमन
Updated On:

विसगाव खोरे, (वार्ताहर) – बालवडी(ता.भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या बालकांची घोड्यावरून ढोल ताशाच्या गजरामध्ये गावातून मिरवणूक काढून बालकांचे औक्षण, गुलाबपुष्प देऊन शालेय प्रवेशद्वारावर रांगोळीवर पाय उमटवून शाळेतील पहिले पाऊल टाकत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे, मुख्याध्यापक भिमराव शिंदे शिक्षक महादेव बदक,
आनंदा सावले, अंजना कोंढाळकर, विश्वनाथ किंद्रे, अजित गायकवाड,शिवाजी फणसे, विशाल गायकवाड, सिध्देश भोसले, पालक विद्यार्थी उपस्थित होते.



